अचानक प्रकृती बिघडल्याने आंदोलनकर्त्या कामगाराचा मृत्यू  अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

अचानक प्रकृती बिघडल्याने आंदोलनकर्त्या कामगाराचा मृत्यू

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथील एलोरा पेपर मिल कारखान्यात काम करणारे कामगार त्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील 9 ऑगस्टपासून धरणे आंदोलनावर बसलेले आहेत.

अभिजित घोरमारे

भंडारा - भंडारा जिल्ह्यातील एलोरा पेपर मिल येथे धरणे आंदोलनास बसलेल्या कामगारांपैकी हंसराज बकाराम मारबदे यांचा काल आंदोलनादरम्यान अचानक प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथील एलोरा पेपर मिल कारखान्यात काम करणारे कामगार त्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील 9 ऑगस्टपासून धरणे आंदोलनावर बसलेले आहेत.

हे देखील पहा -

एलोरा पेपर मिल कारखान्यातील सुमारे 200 स्थायी व अस्थायी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर येण्यास कारखाना प्रबंधकाने मनाई केली. दुसरीकडे कारखान्याबाहेरील कंत्राटी कामगारांना बोलावून कामे सुरू आहेत. येथे शासनाची परवानगी न घेता कारखान्यातून साहित्य बाहेर नेणे सुरू असून कारखान्यातील यंत्र काढून नेणे सुरू आहे. याची चौकशी करून कामगारांना न्याय मिळावा व 11 कामगारांना परत कामावर रुजू करावे याकरिता कामगारांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान देव्हाडा खुर्द येथे राहणारे हंसराज बकाराम मारबदे हे दररोजप्रमाणे मंगळवारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी 11 वाजताच्या दरम्यान त्यांची अचानक प्रकृती खालावली, त्यांना लगेच तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कोणत्या प्रकारचा सुधार झाला नाही व काल बुधवार सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एलोरा पेपर मिल कारखान्याने ज्या 11कामगारांना कामावरून काढले होते, त्यात हंसराज यांचाही समावेश होता. या अन्यायाविरोधात मागण्यासाठी सर्व कामगारांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन पुकारले होते. शेवटी त्यांच्या मृतदेहासह कामगार कारखान्यावर धड़कले या सर्व प्रकारामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT